PostImage

Ramdas Thuse

July 19, 2024   

PostImage

शहरातील युवकांचा कॉग्रेस पक्षात प्रवेश


चिमूर:-

         चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून युवक काँग्रेस चिमूर विधानसभा उपाध्यक्ष राकेश साठोने यांच्या नेतृत्वात शुक्रवारला चिमूर येथील तालुका कॉग्रेस कार्यालयात चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील गुरुदेव वार्ड, वाल्मिक चौक येथील युवकांनी काँगेस पक्षाचे दुपट्टे घालुन प्रवेश घेतला आहे. 

           दरम्यान सुरज हेमके,चेतन चाचरे,अजय मोहीनकर, कुनाल नागपूरे, भारत मोहीनकर, नवनित गोटे, किरण हेमके ,पवन सातपुते, सुमित सातपुते,सांरग मामीडवार, अमित सातपुते, राजू डांगे, गणेश दिघोरी आदी युवकांनी कॉग्रेस पक्षात प्रेवश केला.

       यावेळी माजी नगरसेवक विनोद ढाकूनकर, कॉग्रेस जेष्ठनेते विवेक कापसे,मिडिया प्रमुख पप्पूभाई शेख, राकेश साटोने, अक्षय लांजेवार ,श्रीकांत गेडाम आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

art of living

Sept. 6, 2023   

PostImage

सोशल मीडियाची नवीन टिम करणार चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे हात मजबूत...


नागपूर येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान...

चंद्रपूर :- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह नागपूर येथे आयोजित एकदिवसीय सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडियाच्या नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी जिल्हात सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी एकजुटीने व ताकदीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. 
    यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून प्रा. प्रफुल शेंडे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून सारंग शंकरराव चालखूरे, बल्लारशा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून प्रशांत झाडे, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून चोकेश्वर भरडकर, चिमूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण झिल्लारे आदि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तर लवकरच जिल्हा सोशल मीडियाचे अन्य पदाधिकारी, जिल्हातील सर्व विधानसभा क्षेत्रातील अध्यक्ष व त्यांच्या टिम मधील अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात येणार आहे. 
या कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आकाश तायवाडे, सुमित लोणारे, बिलाल अहमद, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे उपस्थित होते.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रामु तिवारी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यासह जिल्हा काँग्रेस व स्थानिक विधानसभा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.